सेलू येथील अंगणवाडीत पोषण आहारात अळ्या निघाल्याने सर्वत्र खळबळ उडाली……

अंगणवाडी मार्फत शालेय पोषण आहार वाटप करण्यात आले आहे त्यात just universal pvt ltd. Ya कंपनीचे पोषण आहार संपूर्ण पॅकेट मध्ये अळ्या आढळून आल्या आहेत . शालेय पोषण आहार गर्भवती स्त्रिया व छोटे बाळ यांना शाशना तर्फे पोषण आहार योजना मधुन धान्य पुरवठा केला जातो आहे अश्या या पॅकेट मध्ये मोठ्या प्रमाणात अळ्या आढळून येत आहे. त्यामुळे सर्व शासनाचा पैसा व्यर्थ जातो आहे, परंतु आपल्या पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सर्व अधिकारी वर्ग यावर जाणीव पूर्वक दुर्लक्ष तर करीत नाही असा प्रश्न निर्माण होतो आहे. डाळ, तिखट, मीठ एकत्रित करून, तसेच गव्हाचे पीठ साखर एकत्रित करून आहार ठेकेदाराकडून पुरवला जातो संबंधित ठेकेदार, कंपनीने सेलू तालुका येथील पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सर्व अंगणवाडी गावा गावात पोहचवले आहे. करीता आपणास विनंती आहे की आपण सदर बाब लक्षात घेऊन अन्न व औषधी प्रशासन विभागाला कळवून सदर सेलू तालुक्यातील सर्व अंगणवाडीतील साठा यांच्या मार्फत तपासणी करून आढळून आलेल्या सर्व दोषिंवर कठोर कारवाही करावी. अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्ष सेलू तालुका तर्फे केली आहे अन्यथा आंदोलनाची भूमिका घेतली जाईल असे निवेदनातून सांगितले आहे

Leave a Reply