
माणुसकी हाच आमचा धर्म !सेवा हेच आमचे प्रथम कर्तव्य.आज दिनांक 30 एप्रिल 2026 रोजी प्रहार चे कार्यकर्ते महेंद्र डंभारे यांनी विकास वासुदेवराव दांडगे (जिल्हा प्रमुख प्रहार संघटना.) यांना फोनवर माहिती दिली की कस्तुरबा रुग्णालय सेवाग्राम येथे न्यूरोसर्जरी विभागात समीर मांडवे हे उपचार घेत आहेत आणि परिस्थिती खूप गरीब आहे, डॉक्टर श्रीवास्तव यांनी आज सकाळ पासून पैसे भरण्यासाठी साठी त्यांना त्रास दिला आहे.आणि 4च्या सुमारास दुपारी डॉक्टरांनी कहर केला की आताच पैसे भरा नाहीतर तुमची ट्रीटमेंट करणार नाही अन्यथा घरी जा पैसे नसतील तर इथे काही होणार नाही, अपमानाची वागणूक सर्वांन समोर दिली अशी माहिती मला फोन वरून मिळताच विकास वासुदेवराव दांडगे (जिल्हा प्रमुख प्रहार संघटना.) यांनी याबाबत माहिती घेतली आणि हॉस्पिटल चे डीन, सचिव आणि एम एस यांना मॅसेज करून माहिती दिली आणि श्री. श्रीवास्तव नावाचे डॉक्टर जे कुणाच ऐकत नाही म्हणे ते बरोबर सरळ झाले,अगदी 15 मिनिटात व्यवस्थापनाचा फोन आला आणि आता अडचण होणार नाही याची हमी दिली.रुग्णाला होत आलेल्या त्रासाचा तोडगा तात्काळ प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दूर करून माणुसकी हाच आमचा धर्म !सेवा हेच आमचे प्रथम कर्तव्य. आज पून्हा सिद्ध केले व रुग्णाच्या नातेवाईकांनी प्रहार कार्यकर्ते पदाधिकारी विकासदादा दांडगे, विवेक धोंगडे, महेंद्र डंभारे यांचे आभार मानले व असा भविष्यात कुणाला त्रास होऊ नये अशी आशा रुग्णाच्या नातेवाईक व्यक्त करीत होते.तसेच व्यवस्थापनाचा फोन आला आणि आता अडचण होणार नाही याची हमी दिली.याबद्दल सेवाग्राम कस्तुरबा व्यवस्थापनाचे सुद्धा प्रहारच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.