तळोदी येथे चिमुकल्यांची आरोग्य तपासणी शिबिर…

एकादशी सोशल वेल्फेअर फाउंडेशन व वैद्यकीय जनजागृती मंच वर्धा द्वारा आयोजित लहान मुला मुलींचे आरोग्य तपासणी आरोग्य व मार्गदर्शन शिबिर तळोदी येथे गुरुवार दिनांक 19 सप्टेंबर 2024 सायंकाळी आठ वाजता राबविण्यात आले यावेळी 60 ते 70 चिमुकल्यांचे आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत औषधी वाटप करण्यात आले , लहान मुलांना व तसेच आहार स्वच्छता आरोग्य संबंधित काळजी घेणे दिनचर्या व्यायाम मोबाईल मुळे होणारे नुकसान आपल्या सभोवताल असलेले फळ व खाद्यपदार्थ स्थानिक ठिकाणी तयार होणारे किती फायदेमंद आहे, याबाबत सोप्या व सरळ भाषेमध्ये सर्वांना कळेल असे सुंदर मार्गदर्शन डॉक्टर मा. सचिन पावडे सर यांनी गावकऱ्यांना केले, आपल्या मुलांना कशी निरोगी ठेवता येईल व स्वस्थ ठेवता येईल कसे सुदृढ बाळ बनेल हे सर्व गावकऱ्यांना पटले व याचा नक्कीच सर्वांना फायदा होणार अशी ग्वाही गावकऱ्यांकडून देण्यात आली यावेळी सर्वत्र तळोदी गावातील जनतेमध्ये एक आनंदाचे वातावरण तयार झाले व सर्वांनी मनःपूर्वक आभार मानले, विशेष म्हणजे आयोजक महिंद्र डंबारे व डॉक्टर माननीय सचिन पावडे तसेच उपस्थित त्यांचे सहकारी डॉक्टर अभिजीत सर या कार्यक्रमाला यांचे विशेष योगदान लाभले
यावेळी उपस्थित टीम डॉक्टर सचिन पावडे अभिजीत सर त्यांची टीम तळोदी महादेव मंदिर येथे उपस्थित होते तसेच एकादशी सोशल वेल्फेअर फाउंडेशन चे अध्यक्ष माननीय श्री लीलाधर कोंबे व सचिव श्री विवेक भाऊ धोंगडे तळोदी चे महेंद्र डंबारे अनिकेत कोल्हे, विशाल ठवरे, केतन आदमने ,सचिन बावणे ,गौरव ठवरे, तुषार गोहने ,प्रतीक आदमाने अक्षय कोल्हे , साधारण 40 ते 50 युवा कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Reply