प्रहारचा दणका,100 चा स्टॅम्प सक्ती हटवण्यात आली.

सन 2023 मध्ये ई पीक पाहणी केलेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक सामायिक खातेदार स्वतः हजर राहून सामायिक पत्रावर सह्या करत असेल तर साध्या कागदावरचे ना हरकत संमती पत्र गृहीत धरले जाईल.(स्टॅम्प पेपर ची आवश्यकता नाही) असा निर्णय घेण्यात आला व सेलू तालुक्यातील सर्व कृषीसहायक यांच्या तर्फे गावा गावात व्हॉट्सॲप द्वारे सर्व शेतकऱ्यांना सूचना देण्यात येत आहे.

प्रहार जनशक्ती पक्ष सेलू यांच्या वतीने कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते की शेतकऱ्यांना शंभर रुपयाचे स्टॅमची सक्ती करू नये 100 रुपयाच्या स्टॅम्पवर अफीडिव्हेट करून विनाकारण चा खर्च शासनातर्फे शेतकऱ्यांना करावा लागत आहे. सततच्या पावसामुळे मागील दोन महिन्यापासून शेतकऱ्यांना कोणतीही रोज मजुरी नसून आर्थिक परिस्थिती नाजूक झालेली आहे अशा स्थितीमध्ये शंभर रुपयाचे स्टॅम्प घेऊन त्यावर अफीडिव्हेट करून नाहक खर्च विनाकारांचा भुर्दंड शेतकऱ्यांना पडत आहे. हे सर्व बाब लक्षात येतात प्रहार ने निवेदन देऊन कृषी अधिकारी यांच्याशी चर्चा करून तोडगा काढला. आता यानंतर सामूहिक शेती असणारे शेतकऱ्यांना साध्या कागदावरचे ना हरकत संमती पत्र गृहीत धरले जाईल.(स्टॅम्प पेपर ची आवश्यकता नाही)

कृषी अधिकारी यांच्याशी चर्चा करतेवेळी प्रहार तालुका अध्यक्ष श्री. विवेक धोंगडे, सेलू शहर अध्यक्ष श्री . रोशन कोंबे, विशाल पवार, राजू राऊत, अवी करडे , रुपेश खंडे इत्यादी उपस्थित होते.

तालुक्यातील सर्व शेतकरी प्रहार जनशक्ती पक्षाचे आभार व धन्यवाद मानत आहे.

कृषी सहायक द्वारे सध्या खालील प्रमाणे संदेश देण्यात येत आहे.

जाहीर सूचना कृषी विभाग (महाराष्ट्र शासन) सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींना सूचित करण्यात येते की ई पीक पाहणी सानुग्रह अनुदान 5000/- रुपये हेक्टरी योजनेच्या ज्या लाभार्थ्याने वैयक्तिक संमती पत्र व सामूहिक ना हरकत पत्र दिले नसेल त्यांनी ताबडतोब कृषी विभागांमध्ये किंवा कृषी सहायकाकडे 6/9/2024 पर्यंत जमा करावे. आपल्या आजूबाजूच्या शेतकरी बांधवांना सुचित करावे.संमती पत्र व ना हरकत पत्र आणून देण्यास उशीर झाला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी शेतकऱ्यांची राहील हे लक्षात असू द्यावे.बाहेरगावी असलेल्या शेतकरी बांधवांना व नातेवाईकांना सूचित करावे.

जाहीर सूचना(महाराष्ट्र शासन कृषी विभाग )सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींना सूचित करण्यात येते की सन 2023 मध्ये ई पीक पाहणी केलेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक सामायिक खातेदार स्वतः हजर राहून सामायिक पत्रावर सह्या करत असेल तर साध्या कागदावरचे ना हरकत संमती पत्र गृहीत धरले जाईल.(स्टॅम्प पेपर ची आवश्यकता नाही)

Leave a Reply