
आज कस्तुरबा रुग्णालय सेवाग्राम व महात्मा गांधी इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल कॉलेज सेवाग्राम हे शासनाने ताब्यात घ्यावे आणि ते शासनाने चालवावे या मागणीचे निवेदन वर्धा जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे साहेब,राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री,देवेंद्रजी फडणवीस ,अजित दादा पवार,आरोग्य मंत्री तानाजी सावंत उच्च व तंत्र शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ या सर्वांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे,रुग्णालय प्रशासनाचा भोंगळ कारभार,रूग्णांना होत असलेला मानसिक व शारीरिक त्रास,रुग्णांची गैरसोय,योग्य उपचार सुद्धा आज या रूग्णालयात मिळत नाही आहे.
महात्मा गांधी यांच्या विचारांतून सुरू झालेले हे रुग्णालय व मेडिकल कॉलेज आहे स्व.सुशीलजी नायर यांनी वर्धा जिल्हय़ातील आणि परिसरातील गोर गरिबांना चांगली आरोग्य सुविधा प्रदान व्यावी या संकल्पनेतून कस्तुरबा हेल्थ सोसाइटी ची निर्मिती केलीआणि त्या अंतर्गत रुग्णालय आणि कॉलेज सुरू करण्यात आले,या सर्व बाबींचा विसर सोसायटीला पूर्ण पणे झाला आहे.
रूग्णालयात येणाऱ्या रुग्णांन कडून आपण जर विचारणा केली तर अगोदर सारखी सेवा आणि योग्य उपचार येथे आता मिळत नसल्याचे सर्व जण बोलतात. जिल्ह्यात तर अतिशय वाईट प्रतिक्रिया सध्या नागरिकांन मध्ये आहेतआणि ही खोटी बाब नाही आहे,
सोसाइटी ला प्रहार कडून अनेकदा चुकीच्या वर्तना बाबत, योग्य उपचार मिळण्या बाबत अनेक निवेदन दिले आहेत,जिल्हा प्रशासनाला ही माहिती निवेदन दिले आहेत,पण काही वर्षीपासून इथली सेवा पूर्ण पणे ढासळली आहे,अनेक अश्या गोष्ठी आहेत ज्या रुग्णांच्या हिताच्या नाहीत, अनेक प्रकारच्या फी वाढविण्यात आल्या आहेत,अनेक लोकांना हेतुपुरस्सर प्रमोशन, रिटायर्ड नंतर ही त्यांना नियमबाह्य पद्धतीने पुन्हा घेणे,रुग्णांना चांगली आरोग्य सुविधा मिळाली पाहिजे या करीता काहीच प्लान यांच्या कडे नाही, यांचा एकच उद्देश आहे पैसे कमवण्याचा परंतु या रुग्णालयाची निर्मिती आर्थिक फायदा होण्या करिता नाही आहे,तर नागरिकांना योग्य सुविधा आणि माफक दरात आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी हा उद्देश स्वः सुशीलाजी नायर यांचा होता आणि तो अनेक वर्षांपासून टिकून ही होता पण 3,4 वर्षीपासून काही ठराविक लोकांन कडून येथे आर्थिक बाजार सुरू करण्यात आला आहे,परिवार वाद सुरू आहे,आज रूग्णालयात अनेक स्पेशालिस्ट डॉक्टरांची कमतरता आहे त्याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही,अनेक ठिकाणी नवीन ICU ची गरज आहे,
पण नाही साधी सोनोग्राफी करायची असेल तर 1 महिना वेटिंग सांगतात, MRI ,CT SCAN ची अवस्था अशीच आहे BPL धारकांना ही बळजबरीने बिल भरावे लावण्यात येत आहे,अनेक तक्रारी आहेत,आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शासना कडून यांना राज्य सरकार कडून 25 % आणि केंद्र सरकार कडून 50 % म्हणजे 75% टक्के अनुदानावर हे रुग्णालय आहे आणि 25 % सोसाइटी असा हा कार्यभार आहे,जर शासन आमच्या आरोग्यावर इतका निधी खर्च करित आहे तरी सुद्धा नागरिकांना हे चांगले आरोग्य प्रदान करू शकत नसतील तर इतक्या मोठ्या निधी चा उपयोग काय,या रुग्णालया मध्ये जास्तीत जास्त रुग्ण ग्रामीण भागातील आणि गरीब व्यक्ति उपचारार्थ येतात त्याची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट अश्यात ते विश्वासाने येतात परंतु योग्य उपचार ही मिळत नाही आणि आर्थिक मानसिक त्रासाला समोर जावे लागते आहे,हळूहळू सर्व गोष्ठी बाहेर काढणार ,अनेक चांगले डॉक्टर आहेत जे रुग्णालय सोडून गेले,अंतर्गत कर्मचारी वर्गा मध्ये ही खूप नाराजी आहे,परंतु आज शासना कडे मागणी केली, की शासनाने सर्व बाजू तपासून घ्याव्या आणि हे रुग्णालय आणि कॉलेज शासनाने पूर्ण पणे ताब्यात घ्यावे आणि नागरिकांना चांगली आरोग्य सुविधा उपलब्ध करावीही मागणी प्रहार तर्फे केली आहे.लवकरच प्रहार अभिनव पद्धतीने आंदोलन सुद्धा करणार, सोसायटी हटाव
शासन बिठाव .
या प्रकारचे निवेदन आज जिल्हा प्रमुख विकास दांडगे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी वर्धा यांच्या मार्फत देण्यात आले,
निवेदन देतांना प्रीतम कातकीडे ,मंगेश मुडे, सूरज घायवट,भूषण येलेकार, अमोल आकुड, विवेक धोंगडे, प्रमोद म्हैसकर, शैलेश कोसे,महेंद्र दांभारे, मुकेश वाघमारे,अमोल आव्हाड, रोशन दाभाडे,श्रीकांत पेरकुंडे, विशाल गावंडे,नितेश चातूरकर , स्वप्निल उके. अमरदिप गांजरे इत्यादी उपस्थित होते.