
आज केंद्रिय आरोग्य राज्यमंत्री व आयुष मंत्री श्री. प्रतापराव जाधव यांना कस्तुरबा रुग्णालय सेवाग्राम आणि महात्मा गांधी इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंस कॉलेज सेवाग्राम जि.वर्धा हे सरकारने आपल्या ताब्यात घेण्यात यावे या प्रकाराची मागणी निवेदन देऊन करण्यात आली त्यांनी ही मी स्वत या बाबत पूर्ण माहिती घेतो आणि पूर्ण प्रकारे मदत करण्याची हमीं दिली
गरजूंना चांगली आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी या करिता सदरील रुग्णालयाची निर्मिती झाली आहे,
महात्मा गांधी यांच्या विचारांतून स्व. सुशीलाजि नायर यांनी या रुग्णालयाची व कॉलेज ची निर्मिती केली आहे,
परंतु रुग्णांना काही वर्षांपासून होत असलेला त्रास आणि फक्त स्वतः च्या फायदा करिता सोसायटी चा सुरू असलेला व्यवहारचीही महिती देण्यात आली.
यावेळी प्रहारचे प्रहार विद्यार्थी संघटनेचे शहर प्रमुख शुभम भोयर व आमचे मित्र माजी सैनिक विवेक ठाकरे उपस्थित होते.
विकास दांडगे – वर्धा जिल्हा प्रमुख प्रहार जनशक्ती पक्ष कस्तुरबा रुग्णालय सेवाग्राम आणि महात्मा गांधी इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंस कॉलेज सेवाग्राम जि. वर्धा हे सरकारने आपल्या ताब्यात घ्यावे.