
सेलू तालुक्यातील बोरी बोरधरण या गावामध्ये पावसाने नाल्याची बांध फोडून गावामध्ये शांतीनगर या ठिकाणी लोकांच्या घरामध्ये पाणी घुसले सकाळी सर्वत्र लोकांची पंचायत झाली त्यावेळी काही सुचेना.
अश्यातच काय केले पाहिजे कशामुळे गवत पणी येत आहे त्याचे उगं शोधून बोरी बोरधरणं येथील सैनिक रवींद्र वानखेडे यांनी चर्चा केली व पाठीमागून आपण पाणी गावाबाहेर घुसने बंद करू शकतो असा आत्मविश्वास दिला व लगेच टीम वर्क सुरू केले यासाठी सैनिक रवींद्र वानखेडे व पोलीस पाटील विकासजी कोकाटे आणि गावातील प्रतिष्ठित लोकांनी नाल्याचे पाणी वळून सामाजिक बांधिलकी जपली व गावातील पावसाचे पाणी गावाबाहेर काढले.
यावेळी केलेल्या सहकार्याबद्दल सर्वांचे रवी वानखेडे व गावकरी मंडळी यांनी आभार व्यक्त केले, सतत गावात अनेक लोकहिताचे कार्य करीत असल्याने सैनिक रवींद्र वानखेडे हा चेहरा सतत गावांसाठी निस्वार्थ गाव प्रेमी ठरत आहे.
आषाढी एकादशी व मोहरमला गावावर आलेल्या समस्येचे निराकरण केले म्हणून गावकरी मंडळी रवी वानखेडे यांनी चर्चा करुन समोर अशी वेळ येऊ नये त्यासाठी एकजूट होऊन सहकार्य करावे अशे आव्हान गावकऱ्यांना केले…..
