
घोराड येथे आ. सि. लुसी कुरियन दीदी यांनी सुरू केलेल्या माहेर शांती निवास येथील अनाथ निराधार 8 बाबा व माहेर हिरा निवास सावंगी मेघे येथील 2 आजीनी या जगाचा निरोप या दोन वर्षात घेतला त्याची आठवन राहावी आणि ते अनाथ निराधार असेल तरी ते या माहेर परिवाराचा एक भाग म्हणून जगले त्याची सेवा करण्याचे भाग्य आम्हाला लाभले ते जाण्याने जे दुःख झाले ते दुःख कमी करून निसर्गात ते नेहमी या झाडाचा माध्यमातून जिवंत राहील व सर्वांना सावली देईल या हेतूने ज्या स्मशान भूमी मध्ये त्यांचा शेवट झाला त्या बेलगाव स्मशान भूमीत व सेलू कब्रिस्तान यात मोहरम व आषाढी एकादशी च्या निमित्ताने 10 झाडे लावण्यात आली.
या उक्रमाअंतर्गत त्यांनी जिवंत असताना समाजाला काही दिलं नाही पण गेल्यावर त्या झाडाच्या माध्यमातून समाजात जिवंत राहील व सावली देईल हा हेतू संस्थेचा आहे.
सुरवातीला महाबळा येथील बाल गोपाल भजन मंडळ यांचे भजन संस्थेत झाले या कार्यक्रमसाठी डॉ. सचिन पावडे सर व त्यांच्या मित्र परीवार श्री विवेक पंढरी धोंगडे ( सेलू तालुका अध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष.) माहेर शांती निवास चे प्रकल्प प्रमुख अतुल शेळके शुभम झांबरे सुरज ढोले व सर्व बाबा लोक झाडे लावण्यासाठी हजर होते .
