
प्रार्थना ही बल प्रदान करते तसेच भयमुक्तही करते. यह डर सभी जाता रहे. मनबुदीका इस देहका नीर्भय रहे हम कर्ममे परदा खुला कर स्नेहका ॥
प्रार्थना जीवन जगण्यासाठी आधार प्रदान करते तसेच आमच्या पूर्ण व्यक्तीत्वाला प्रभावीत करते हम हो पूजारी तत्वके गुरूदेवके आदेश के। सच प्रेम के नित नेम के सद्धर्मके सतकर्मके ।। प्रार्थनेपासून काय प्राप्त होत.
१) संपूर्ण स्वास्थ प्राप्तीचे साधन संपूर्ण स्वास्थाचे तीन भाग आहेत या तीघांचाही परस्परांशी पनीष्ट संबंध आहे. प्रार्थनच्या अभावाने आध्यात्मीक भागाची अवहेलना होते त्याचा परिणाम मानसीक व शारिरिक भागावरही होतो. प्रार्थनेमुळे बल व शक्ती प्राप्त होते. प्रतीकुल परीस्थीतीला अनुकुल परीस्थितीत बदलण्याचा ज्ञान प्राप्त होते. त्यामुळे मानसीक दृढता येते. शारिरिक, मानसिक व आध्यात्मीक स्वास्थ म्हणजे पूर्ण स्वास्थ समजले जाते जे प्रार्थनेमुळे प्राप्त होते.
२) आत्मशोधन करण्याचे साधन प्रार्थनेचा आपल्या जीवनात महत्वपूर्ण उद्देश आहे आत्मोन्नती, “इस अमर आत्मा का हमे हर श्वासभर मे गम रहे। गर मौतभी हो आगयी सुख दुःख हममे सम रहे सतत प्रार्थना करत असताना आत्मनिरिक्षण करण्याची सवय लागते, त्यामुळे आपले मन, वचन व कर्म यांचे कुठे स्खलन होत आहे याची जाणीव होते व त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला जातो त्यामुळे आत्मशोधन होऊन आत्मशुद्धी साधली जाते.
नात्मशुध्दी साधली जाते.
3) आध्यात्मीक सामर्थ्य प्राप्तीचे साधन :
प्रार्थना केवळ आत्मशोधन करीत नाही तर आध्यात्मीक सामर्थ्य प्रदान करते. “आध्यात्मकी शक्ती हमें पलभी नही करके जुदा ही आध्यात्मीक शक्ती प्रार्थनेनेच प्राप्त होते. मनाची चंचलता दूर होऊन मन स्थीर होते. चित्त वृत्तीवर साधकाचे नियंत्रण होते. अहं चा नाश होतो. ईश्वराच्या सर्वव्यापकतेची अनुभूती होते.
4)कैवल्य प्राप्तीचे साधन :
“तुकड्या कहे ऐसा अमरपद प्राप्त हो संसार में छोडे नही घरबार पर, हो मस्त गुरूचरणारमें ।”
सतत प्रार्थनेमुळे स्थीर चित्त वृत्ती, मनाचा संयम, आत्मोन्नती याद्वारा परिपूर्ण आध्यात्मीक सफलता प्राप्त होते. जीवनामध्ये सामंजस्य निर्माण होते. कैवल्यप्राप्ती हेच अमरपद त्याकरीता आत्मचिंतन, मनन, निर्विकल्प ध्यान आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्ती संसारात राहुनच हे अचमरपद प्राप्त करु शकतो. विश्वात्मक भावना, परमार्थाकडे वाटचाल करण्यासाठी प्रार्थना हे सर्वोत्तम साधन होय.
“है प्रार्थना गुरूदेवसे यह स्वर्गसम संसार हो ।
अती उच्यतम जीवन बने, परमार्थमय व्यवहार हो ||