
आज प्रहार जनशक्ति पक्ष तर्फे राज्यभर रक्तदान शिबीर आयोजित करून रक्तदान आंदोलन करण्यात येणार आहे.
शेतकरी कर्जमाफी चा दिलेला शब्द पळण्या करिता.
या प्रमुख मागणी सोबत आणि दिव्यांगाना 6 हजार रुपये मासिक पगार सोबत शेतमालाला हमीभाव देण्यात यावा. आज वर्धा जिल्हय़ातील पालकमंत्री राज्यमंत्री पंकज जी भोयर यांच्या ही निवासस्थाना समोर शांततेच्या मार्गाने रक्त घ्या पण कर्जमाफी करा असा उद्देश ठेऊन रक्तदान आंदोलन होते, परंतु पोलिसांन कडून रक्तदानालाच परवानगि नाकारली आणि पूर्ण तयारी ही सरकार ची दडपशाही आहे
पोलिसांन कडून आंदोलन कर्त्याना त्रास देऊन आंदोलन दडपण्याचा प्रयत्न आहे काल उशिरा वर्धा शहर पोलिसांनी नोटिस बजावली आणि रक्तदान आंदोलन मंत्री यांच्या घरासमोर करता येणार नाही . सत्तेत येण्या अगोदर विद्यमान सरकार चे नेते कर्जमाफी करणार असे जाहीर सभेत बोलत होते पण त्याचा त्यांना पूर्ण विसर पडला आहे , आज तरीही रक्तदान करून सरकारला आठवण करून दिले की दिलेला शब्द पाळा,आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध व्यक्त करीत सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी कस्तुरबा रुग्णालय सेवाग्राम येथे जाऊन रक्तदान केले.पोलिसांचा आणि सरकारच्या कृति चा निषेध करण्यात आला.यावेळी विकास दांडगे, विवेक धोंगडे, रवि चौधरी, विशाल पवार, प्रीतम कातकिडे ,अमोल आव्हाड ,सौरभ गोडे ,भूषण येलेकार, मारोतराव गोमासे, सूरज कुबडे, रूशब तडस,रितेश गुडदे ,अतुल अमृतकर ,महेंद्र डंभारे , अनिकेत कोल्हे, मंगेश मुडे, मुकेश वाघमारे इत्यादी कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


