
शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, शेतमाला हमी भाव द्या, अपंगांना दरमहा 6 हजार रुपये द्या, या प्रमुख मागण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाने शुक्रवारी (दि. 11) रात्री 10.30 वाजता मशाल आंदोलन करण्यात आले आहे. पण पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आंदोलकांना ताब्यात घेतले आणि शहर पोलिस ठाण्यात आणले.
शुक्रवारी रात्री प्रहारचे वर्धा जिल्हाप्रमुख विकास दांडगे यांच्या नेतृत्वाखाली राज्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मशाल आंदोलन होणार होते. मात्र, गोंधळ होऊ नये, म्हणून पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखण्याच्या प्रयत्नात होती.
मात्र, कार्यकर्ते पोलिसांना चकमा देऊन छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचून आंदोलन केले. हे लक्षात पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले. प्रहारचे कार्यकर्ते राज्यमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे जाण्यापूर्वी पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले. आंदोलनात (प्रहारचे जिल्हाप्रमुख )-विकास दांडगे, राजेश सावरकर, प्रीतम कातकिडे (आष्टी तालुका प्रमुख),विवेक धोंगडे( सेलू तालुका प्रमुख), विशाल पवार , रवी चौधरी, शुभम भोयर, श्रीकांत पेरकुंडे भूषण येळेकर, अमोल आव्हाड, रोशन दाभाडे, सौरभ गोडे, , बिट्टू रावेकर, शैलेश सहारे यांच्यासह प्रहारचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्या अटक करून त्यानंतर रात्री उशिरा सोडून देण्यात आले.




