

गावठाण प्रमाणपत्र देण्यात येत नसल्यामुळे त्याअभावी गावठाण हद्दीतील मिळकतीच्या व्यवहारांचे दस्ताऐवजांची नोंदणी होत नाही परिणामी आम जनतेत अनेक अडचणीचा सामना करावा लागत असून असंतोष निर्माण झाल्याचे दिसून येते. गाठाण प्रमाणपत्रांचे अभावी स्वयंघोषणापत्राचे आधारे अशा दस्ताऐवजांची नोंदणी केल्यास मिळकतीमध्ये त्रयस्थ पक्षांचे हितसंबंध निर्माण होण्याची शक्यता आहे, परिणामी स्थावर मिळकर्तीच्या मालकी हक्कांचे वाद-विवादाचे प्रकरणांची संख्या दैखिल वाढण्याची शक्यता आहे. तसेच स्वयंघोषणापत्रांचे आधारे दस्ताऐवजांची नोंदणी केल्यास शासकीय जमिन आणि अतिक्रमण केलेल्या जमिनींचे दस्तांची नोंदणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भूमी अभिलेख विभागामार्फत ज्या गावांचे गावठाण हद्दीचे सर्वेक्षण पूर्ण झालेले आहे त्या सर्व मिळकतीचे मालमत्ता पत्रक लवकरात लवकर तयार करून निर्गमित करावे. (सत्ताप्रकार ‘अ’ गावठाण हद्दीतील मिळकत) गावठाण हद्दीतील ज्या मिळकतीचे सर्वेक्षण पूर्ण झालेले आहे परंतु मालमत्ता पत्रके तयार झालेली नाहीत अशा मिळकती गावठाण हद्दीतील अना याबाबत भूमी अभिलेख विभागाने प्रमाणपत्र निर्गमित करावे, व दुय्यम निबंधक यांनी ते दस्ताचा शान कराते आणि अद्याप ज्या गावांचे गावठाण क्षेत्रांचे सर्वेक्षण झालेलेच नाही त्या गावांकरीता गावठाण प्रमाणपत्र, नगर मालिका नगरपरिषट, ग्रामपंचायत किवा तलाठी यांनी निर्गमित करावे व ते दुय्यम निबंधक यांनी दस्ताचा भाग करावे. सदर प्रमाणपत्र निर्गमित करतांना प्रमाणपत्रचत मिळकत शासकीय नाही व अतिक्रमण केलेली नाही असा उल्लेख असणे आवश्यक राहील जेणेकरून त्रयस्त पक्षकारांचे हितसंबंध हस्तांतरीत होणा-या मिळकतीमध्ये निर्माण होणार नाही.
तसेच ज्या गावातील गावठाण हद्दीतील संपूर्ण मिळालीची मिळकत पत्रिका (मालमत्ता पत्रक) भूमी अभिलेख विभागाने तयार केलेल्या आहेत, त्या गावांची व त्यातील निळक्तींची अद्यावत यादी नोंदणी कार्यालयास पुरविण्यात यावी,
ग्रामपंचायत अंतर्गत गाव नमुना आठ या मिळकत पत्रिकेमध्ये सदर मिळकत हि 1) शासकिय नाही, 2) शासकिय अतिक्रमण मधील नाही, 3) या मिळकतीचा भूमिअभिलेख विभागा मार्फल सिटी सब्र्व्हे झालेला नाही, या तिन बाबी सदर गाव नमुना आठ या मिळकत पत्रिकेमध्ये नमुद करणे आवश्यक आहे.
उक्त आदेशाचे पालन करण्यास कतुर मारणारे अधिकारी कर्मचारी यांचे विरोधात कार्यवाही प्रस्थापित करण्यात येईल याची गांभिर्याने नोंद घ्यावी.
स्वाक्षरी/-xxx (राहुल कर्डीले) जिल्हा निबंधक तथा जिल्हाधिकारी,
हा आदेश राहुल कर्डीले जिल्हा निबंधक तथा जिल्हाधिकारी, यांनी 11/7/2023 ला निर्गमित केला असून सुद्धा आदेशाचे पालन करण्यास तयार नसल्याचे दिसून आले असता प्रहार जनशक्ती पक्ष सेलू तालुका अध्यक्ष विवेक धोंगडे व शाखा प्रमुख महेंद्र डंभारे यांनी पंचायत समिती मध्ये बि.डी.ओ.यांच्या दालनात ठीय्या मांडला व उपरोक्त विषयावर चर्चा करून तत्काळ सर्व ग्रामसेवक यांना 11/7/2023 जिल्हाधिकारी यांच्या या आदेशाला विचारत घेऊन सर्व सामान्य जनतेला आपले घर नावी करण्या करिता आवश्यक असलेले गावठाण प्रमाणपत्र सर्वांनी देण्यात यावे व असे प्रमाणपत्र देण्यास कोणतेही कारण नसताना हेतू पुरस्पर अडवून गावठाण प्रमाणपत्र देण्यासाठी नाकार दिल्यास आदेशानुसार करीवाही केली जाणार असल्याचे पत्रक प्रसिद्धीस काढून गटविकास अधिकारी यांनी पंचायत समिती स्थळावरून आदेश देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली व त्यानंतर शेवटी गटविकास अधिकारी यांनी आश्वासन दिले की आपण केलेल्या चर्चेचा मार्ग म्हणजे सर्वांना आदेश देण्यात येतील व अद्याप कुणी जिल्हाधिकारी व गटविकास अधिकारी यांच्या आदेशाची अव्हेलना करून जर का सामान्य जनतेस गावठाण प्रमाणपत्र देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याचे दिसून आले किंवा याबत कोणतीही तक्रार असल्यास संबंधित ग्रामसेवक यांच्यावर काऱ्यवाही करण्यात येतील. असे आश्वासन दिले तेव्हा प्रहार पक्षाच्या पदाधिकारी यांनी समाधान मानले.