
मैत्रीच्या संबंधातून काढलेलीछायाचित्रे समाजमाध्यमावर प्रसारित करण्याची धमकी देत माजी नागरसेविकेवर लैंगिक अत्याचार करून १० लाख रुपये उकळण्यात आल्या प्रकरणी सचिन मच्छिंद्र काकडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना पुण्याची असून पुण्यात एका माजी नगरसेविकेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली.
पालिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सचिन मच्छिंद्र काकडे आणि पीडित नगरसेविकेचे मैत्रीचे संबंध होते. समाजमाध्यमात छायाचित्रे, ध्वनिचित्रफीत प्रसारित करण्याची धमकी सचिन काकडे याने तिला दिली. त्यानंतर त्याने धमकावून नगरसेविकेवर वेळोवेळी बलात्कार केला. २०१७ पासून नगरसेविकेला धमकावून काकडे याने अत्याचार केला होता. तसेच माजी नगरसेविकेला धमकावून वेळोवेळी दहा लाख रुपये उकळले.
मात्र हे इतके होऊनही पुन्हा धमकवण्याचे सोडले नाही. त्याची मजाल वाढत गेली. उलट आपल्या मैत्रीसंबंधाबाबत तुझ्या पतीला माहिती देतो, असे सांगून ब्लॅकमेल करत पीडित नगरसेविकेकडून आणखी पैशांची मागणी करून पीडित माजी नागरसेविकेच्या घरी येऊन तुझ्यामुळे माझी पत्नी सोडून गेली आणि तू दुसरा विवाह केला असे म्हणत • तिला मारहाण केली. अखेर सचिन काकडेच्या त्रासाला कंटाळून माजी नगरसेविकेने पुण्याच्या पर्वती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
सेलू ,वाय पॉईंट बंद न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आंदोलनाचा इशारा.-समीर देशमुख
दि ०२/१०/२०२३ रोजी सेलु येथील दंडारे वाय पॉइंट येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ता सर्वांचा लाड़का समीर धांदे…
महात्मा गांधी जयंती, लाल बहाद्दूर शास्त्री जयंती
भजन गांधी के विरोधीयो, आगे जरा आओ । कुछ करके दिखाओ, और जनताको सुखाओ ।। टेक।।गांधीने…
