महाराष्ट्र गवळी समाज संघटना वर्धा जिल्हा आढावा बैठक व पदाधिकारी नियुक्त्या.

दिनांक. 7 सप्टेंबर 2025 रोजी महाराष्ट्र गवळी समाज संघटना प्रदेश महिला अध्यक्षा सौं वैशालीताई अवथळे, प्रदेश कोषाध्यक्ष यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली 

यावेळी श्री महेशभाऊ अवथळे वर्धा जिल्ह्यातील, वर्धा तालूक्याच्या नवीन आघाडीच्या पदाधिकारी सदस्य नियुक्त्या करण्यात आल्या  वर्धा तालुका महिला आघाडी अध्यक्ष  सौं वसुधाताई धर्मराज वैद्य  , तालुका युवा आघाडी अध्यक्ष  श्री प्रदीप नंदुजी घोडे , तालुका विद्यार्थी आघाडी अध्यक्ष  वेदांत नंदकिशोर गळहाट यांची नियुक्ती करण्यात आली व पुढील वाटचाली बद्दल मार्गदर्शन करण्यात आले , येणाऱ्या काळात संघटणे तर्फे करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात आली.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रदेश महिला अध्यक्षi सौं वैशालीताई अवथळे, प्रदेश कोषध्यक्ष श्री महेशभाऊ अवथळे. जिल्हा अध्यक्ष श्री देवेंद्र ढोबळे, जिल्हा उपाध्यक्ष श्री नितीन घोडे. सचिव श्री मोरेश्वर गळहाट, कोषध्यक्ष श्री आनंदजी अवथळे, जिल्हा महिला अध्यक्षा सौं प्रभाताई कालोकार, सचिव सौं संगीताताई गळहाट, सौं कांताताई चौकोने, श्री पंडितरावं कोरडे, श्री प्रणय येवले पाटील, व मोठया संख्येने तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन श्री उमेश गळहाट, प्रास्तावीक श्री आकाश अवथळे तर आभार प्रदर्शन श्री अमोल सपकाळ यांनी केले.