तरुणांना चालता-फिरता येतोय हार्ट अटॅक!

कोरोनानंतर चुकीची जीवनशैली, खाण्या-पिण्याच्या अनियमित सवयी, अति ताणतणाव यामुळे कोलेस्टेरॉल, रक्तदाब आणि लठ्ठपणा वाढत असून, हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढत आहे. यात सर्वाधिक बळी तरुणांचा जात आहे. जगभरात दरवर्षी हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी सुमारे एक चतुर्थांश मृत्यू भारतात होत असून, ही संख्या १.८ कोटी इतकी आहे.फिटनेससाठी सूर्यनमस्कार हा सर्वोत्तम व्यायाम आहे. मोबाइलचा वापर कमी करा. ध्यान आणि योग्य झोपेची सवय लावा. याचसोबत मानसिक ताण कमी करण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

नेमके काय कराल?■ शून्य साखर असलेला संतुलित आहार घ्या. ■ गव्हाचा वापर कमी करा. बाजरी, ज्वारी, मका, हरभरा, नाचणी,सोयाबीन इत्यादींचा वापर वाढवा.■ प्रथिने चांगल्या प्रमाणात घ्या. तेल आणि तूप कमी प्रमाणात घ्या आणि कच्ची फळे आणि भाज्या आहारात वाढवा.■ दररोज १० हजार पावले चालण्याचा नियम बनवा.■ बसण्याची वेळ ५० टक्क्यांनी कमी केल्यास आजार ८० टक्क्यांनी कमी करता येतात. दिवसभर अधिकाधिक उभे राहा आणि वारंवार चाला.• पुशअप्स, वेट लिफ्टिंग इत्यादींसारखे काही ताकदीचे व्यायाम करा.

Leave a Reply