सेलू तालुक्यातील शेतपिकांच्या नुकसानाची पाहणी

सततचा पावसामुळे शेतपिकांचे झालेले नुकसान व सोयाबीनवरील ‘येलो मोझॅक’ रोगामुळे झालेल्या नुकसानाची आमदार डॉ. पंकज भोयर यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. शेतपिकांच्या झालेल्या नुकसानाचे तत्काळ सर्व्हे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासंदर्भात प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश सबंधित अधिका-यांनी दिले.तालुक्यात मागील काही दिवसांपासून सततचा पाऊस सुरू असल्याने शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे अनेक शेतात पाणी साचल्याने पिके पाण्याखाली आली आहेत. तसेच बोरधरणाचे पाणी सोडण्यात आल्याने नदी नुकसान झाले आहे. मधल्या काळात व नाल्याकाठावरील पिकांचे प्रचंड पावसाचा लपंडाव व आता सततचापाऊस झाल्याने सोयाबीन पिकावर मोठया प्रमाणात रोग आला आहे.

Leave a Reply