

मालवाहू अँपेला ट्रकची मागून धडक, सहा जण बरोबरजात असलेल्या मालवाहू अँपेला भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात मालवाहू आँटोतील सहा जण गंभीर जखमी झाले यात एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे या सर्व जखमींना उपचारासाठी सेवाग्राम रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे हा अपघात रविवारी सकाळी ६.३० वाजताचे दरम्यान घडला.
खडकी जवळ झाला अपघात
सेलू –
वर्धा नागपूर महामार्गावरील खडकी येथील पेट्रोल पंपासमोर केळझर कडून बुटीबोरी कडे जात असलेल्या मालवाहू अँपेला भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात मालवाहू आँटोतील सहा जण गंभीर जखमी झाले यात एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे या सर्व जखमींना उपचारासाठी सेवाग्राम रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे हा अपघात रविवारी सकाळी ६.३० वाजताचे दरम्यान घडला.
केळझर येथील रहिवासी असलेले हे सगळे मालवाहू अँपे क्रंमाक एम एच ३२ एके ११६२ ने विक्रीसाठी असलेले सामान घेऊन सेलडोहकडे जात होते दरम्यान खडकी येथील पेट्रोल पंपासमोर मागाहून भरधाव वेगात आलेल्या ट्रक क्रंमाक एम एच २६ सी एच ४४८७ ने जोरदार धडक दिली यात अँपेतील सहा जण गंभीर जखमी झाले जखमीमध्ये कोमल रूपेश माहुरे वय २८, राजेश जानबाजी माहुरे वय ३०, रूपेश अनिल माहुरे वय ३०, वर्षा दशरथ जगताप वय ४५, शशीकला अरूण जगताप वय ५०, दिपक शेषराव कदम वय ६५ सर्व राहणार केळझर यांचा समावेश आहे घटनेची माहिती मिळताच सेलूतील रुग्णमित्र प्रज्वल लटारे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना आपल्या रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी सेवाग्राम रूग्णालयात दाखल केले यातील कोमल हिची प्रकृती चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे.