100 चा स्टॅम्प 110रुपयाला सेलू तहसील परिसर मध्ये सर्रास लूट.

सेलू तहसील कार्यालय समोर स्टॅम्प विक्री करत असलेले 2 गडी मनमानी करत असल्याची चर्चा सुरु असून सरळ तहसीलदार यांच्यावर प्रश् न उपस्थित करत आहे.

जर 100चा स्टॅम्प लगेच पाहिजे असेल तर 120

थोडावेळ थांबाल तर 110, स्टॅम्प संपले आहे.

अश्या प्रकारे स्टॅम्प खरेदी करीता गेल्या गेल्या ऐकायला मिळते. मध्यंतरी या अगोदर चे तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी हे असतांना निलेश कराळे मास्तरनी यांची कान उघडणी केली होती परंतु काही दिसातच पुन्हा विसर पडला असून पुन्हा यांच्यावर कठोर कार्यवाही व्हावी अशी गरीब मायबाप जनता करीत आहे. सोयाबीन पीक हातून गेले, कपाशी 1,2 वेच्यात सुखून गेली अश्या दुष्काळी परिस्थिती मध्ये जागोजागी तहसील च्या कामामध्ये बेसुमार लूट केली जात असताना यांना कोणाचे कोणत्या अधिकाऱ्यांचे पाठबळ हा संशोधनाचा विषय ठरत आहे.

गरीब रोजमजूर , विद्यार्थी, अपंग, वृद्ध, सर्व जनता यांच्या लुटी मुळे त्रासून आहे. जर हे बंद न झाले तर जनता शासकीय कार्यालयात जाऊन अधिकारी कर्मचाऱ्यांना 10रुपये भीक या स्टॅम्प विक्रेते करीता मागणार अशी भूमिका घेणार अशी चर्चा आहे.

Leave a Reply