कर वाढीबाबत सेलू नगरपंचायतला प्रभाग क्रमांक.7 नगरवसियांचे निवेदन

सध्या आलेल्या वाढीव करा बाबत नगर पंचायत अंतर्गत येणाऱ्या सेलू नगर वासियांना एक प्रत पाठवण्यात आली आहे त्यात वाढीव करा बाबत सांगितले आहे तसेच काही आक्षेप घ्यायचा असेल तर तो नगर पंचायत ला नोंदवा.

       वाढीव करा बाबत आम्हा जनतेला कश्या पद्धतीने सवलत देण्यात येऊ शकते याबाबत आपल्या स्थारावरून बैठक घेतली जावी व त्यासाठी कर नियोजन समिती स्थापन करून त्यात प्रत्येक प्रभाग मधुन 5 लोकांची नेमणूक करण्यात यावी.

        या समिती अंतर्गत  बैठका घेतल्या जाऊन त्यात प्रभागात किती व कोणते विकास काम केले गेले व करायचे बाकी आहे, व तेथील लोकांच्या काय , किती समस्या आहे यावर चर्चा करून निर्णय घेण्यात यावा की प्रभागा द्वारे किती कर घ्यायचा  व कारमध्ये कोणत्या पद्धतीने सर्व सामान्य जनतेला सवलत देता येईल या बाबत विशेष ग्रामसभा घेण्यात येऊन ग्रामसभा मध्ये सर्वानुमते योग्य तो ठराव पारित करून सर्व सामान्य जनतेला न्याय मिळून द्यावा अशी मागणी करण्यात आली

ग्रामसभा घेण्यात यावी 

कर मध्ये सवलत देण्यात यावे 

प्रत्येक प्रभागात नोटीस फलक लावण्यात यावे 

त्या फलकावर नियमित झालेला निर्णय, सूचना, काढण्यात आलेल्या निविदा, कुणाला देण्यात आले.

प्रभागात सुरू असलेल्या विकास काम बाबत माहिती सतत नोटीस फलकावर चुकवून जनतेला विश्वासात घेऊन आपल्या नगर पंचायत मध्ये सर्व काम करणे हे गरजेचे आहे.

       अन्यथा आमच्या प्रभाग क्रमांक 7 खोडके लेआऊट तर्फे अनोखे आंदोलन करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी.

 यात निर्माण होणारा अडचणी कायदा सुव्यवस्था याला सेलू नगर पंचायत जिम्मेदार असणार. असे निवेदन देण्यात आले.

यावेळी खोडके लेआऊट येथील रहिवाशी उपस्थित होते

Leave a Reply