
सेलू खोडके लेआऊट येथील विविध समस्या व मागण्या घेऊन वर्धा सेलू विधानसभा आमदार श्री पंकज भोयर यांच्या सोबत चर्चा करण्यात आली , यावेळी खोडके लेआऊट येथील रुपेशभाऊ कंडे, रोशनभाऊ कोंबे , गणेशभाऊ ढगे, भूषण चिडाम , रोशन ढगे, सुरज ढगे, महादेव वाघमारे स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
आज सेलू येथील विविध विकासकामांच्या कोट्यावधी रुपयांची उद्घाटन करण्या साठी आमदार सेलू येथे आले असता विविध प्रकारच्या मागण्या घेऊन अपेक्षा पूर्ण होणारं अश्या हेतूने रुपेश भाऊ कंडे यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपत सर्व सामान्य जनतेच्या समस्या आमदारांच्या निदर्शनास आणून दिल्या .
आमदार पंकज भोयर यांनी सुध्दा व्यवस्थित रित्या सर्व खोडके लेआऊट येथील विविध समस्या निराकरण करण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी विचारपूस करून तात्काळ होईल तितक्या लवकर सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे स्पष्ट मत व्यक्त केले.