
भरदिवसा दुचाकी वाहन पळवले , प्रहार जनशक्ती पक्ष शाखा तळोदी च्या आक्रोश भूमिकेने चोर पकडुन पोलिसांच्या स्वाधीन.
नाव – अमीत नागोराव ठवरे वय 31 वर्ष शेतकरी गाव-तळोदी , तहसील-सेलू , जिल्हा-वर्धा, दिनांक 25/08/2024 रविवार सकाळी 08:30 मिनिट ला गाडी मालक अमित चे वडील कळ्या रंगाची स्प्लेंडर गाडी नंबर MH-32-AE-3892 घेऊन शेतात गेले गाडी रोडच्या नजदीक उभी करून ठेवली व मजुरांना काम सांगायला लागले त्या नंतर 9:00 वाजता गाडीजवळ जायला निघाले असता रोडवर गाडी न्हवती तसेच त्यांनी गावात जाताच प्रहार जनशक्ती पक्ष शाखा प्रमुख महेंद्र डंभारे यांना घडलेला प्रकार सांगितला.
25 ऑगस्ट रोजी सकाळी शेतालगत ठेवलेली स्प्लेंडर गाडी लंपास करून ती देवळी येथे 10 हजार रुपयाला विकली असे प्रहार जनशक्ती पक्ष तळोदी शाखा प्रमुख महेंद्र डंभारे यांना कळताच केतन आदमने,अक्षय कोल्हे, प्रतिक आदमने, गोरव ठवरे,अमित झोटिंग,प्रशांत लाटकर, अजय बावणे, तुषार गोहणे, अजय इवनाथे, अनिकेत बोडके, अमित ठवरे , वैभव मगर, निलेश सुरजुसे या सर्व कार्यकर्त्यांन सह 25 ऑगस्ट ला शोध सुरू केला, शोधा दरम्यान राजेश मुंगले वय- 39 नामक चोरटा पुजई गावचा खरांगणा येथून ताब्यात घेऊन त्याला सेलू पोलिस ठाण्यात जमा केले व त्याच्या विरुद्ध काल 25 ऑगस्ट रोजी वेळ रात्री 11.30 ला तक्रार नोंदवली.
लगेच त्याला विचारपूस करून आरोपी राजेश मुंगले च्या सांगण्या नुसार देवळी येथे गाडी गहाण ठेवली म्हणून समजले .
सेलू पोलिस टाऊन प्रमुख श्री राकेश देवगडे व त्यांचे सहकारी सोबत देवळी येथे जाऊन गाडी ताब्यात घेऊन सेलू पोलिस ठाण्यात जमा केली, संबंधित गुन्ह्यात आणखी किती आरोपी आहेत याचा तपास सेलू पोलिस करीत आहे. सध्या तरी मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात सेलू ठाण्यात कैद केले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार सर्वत्र चर्चा आहे की , यापेक्षा अधिक गाड्या चोरट्यांनी तालुक्यातील चोरल्या आहे तरी आणखी किती उघडकीस येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.……
क्रमशः……..