रविंद्र बोरी बोरधरण मध्ये नेहमी प्रमाणे आज सुद्धा सेवभावतून ग्राम स्वच्छ्ता व वृक्षारोपन करतांना!!!

रविंद्र बोरी बोरधरण मध्ये नेहमी प्रमाणे आज सुद्धा सेवभावतून ग्राम स्वच्छ्ता व वृक्षारोपन करतांना…..

आज दिनांक 28/7/2024 रोजी भविष्याचे तारे व माझं गाव कसं सुंदर करता यावं याच्या माध्यमातून आज गावातील मुलं-मुली व काही प्रतिष्ठित नागरिक यांच्या साह्याने श्रमदानाचा व वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविण्यात आला.

बोरधरण हे पर्यटन स्थळ असल्यामुळे आणि धरणाचे पाणी सध्या वाढल्यामुळे लोकांची गर्दी खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे, येणारे पर्यटक व त्यांच्या वाहनाची गती जोरात असते , अश्यात बऱ्याच गाड्या त्या ठिकाणी स्लीप होतात हे रवीच्या लक्षात येताच,येणाऱ्या पर्यटकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये , गाडी स्लीप होऊन घसरुन पडू नये अपघात होऊ नये या भावनेतून रवि वानखेडे यांनी चर्चा केली व लगेच नियोजन म्हणून आज गावातील भविष्याच्या तारे स्पोर्ट अकॅडमी च्या माध्यमातून श्रमदान व वृक्षारोपण केले गावा लगत थोड्या अंतरावर लागून असलेल्या ठिकाणी गावातील घाण कचरा जमा होत असते. करिता सर्व घाण काडी कचरा श्रमदानातून स्वच्छ करून त्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले अशाच माध्यमातून गावातील लोकांना एकत्रित करून आपण आपलं गाव कसं स्वच्छ ठेवता यावं यासाठी सतत रोजचा एक तास श्रमदान म्हणून नेहमी गावातील मुल-मुली व काही प्रतिष्ठित नागरिक श्रमदान करत असतात.व बाकी लोकांना सुध्दा आव्हान केले.

बोर व्याघ्र प्रकल्प म्हटलं तर महाराष्ट्रातल सर्वात छोटा व्याघ्र प्रकल्प त्या ठिकाणी लोक आवर्जून येण्या साठी इच्छुक असतात. पण गावाचाही त्याचप्रमाणे विकास व्हावा यासाठी सतत सर्वांना एकत्रित आणून श्रमदानाच्या माध्यमातून स्वच्छता युवा अभियान राबवते यासाठी गावातील श्री रवींद्र वानखेडे गृहरक्षक म्हणून १४ वर्षापासून कार्यरत आहे व ग्रामीण भागातील सतत मुलांना मदत म्हणून छोटासा स्पोर्टिंग अकॅडमी यांच्या माध्यमातून मुलांना मदत करत असते.

यावेळी आज स्वच्छता व वृक्षरोपण कार्यक्रमात गावातील निखिल राऊत, बादल कोवार, रोमिल कुंभरे, शिवम मरसकोल्हे, प्रीतम किरडे, नंदकिशोर चौधरी, तनुश्री मेश्रे, भाग्यश्री चौधरी, गोहिंदा भाऊ पेटकर, कामलसिंग मरसकोल्हे, राहुल भाऊ वाघाडे , गौरव गायकवाड उपस्थित होते.

Leave a Reply