शिवशाही बस जळाली, सर्व प्रवासी सुखरूप.

अकोल्यात 44 प्रवाशांनी भरलेल्या बसला अचानक आग लागली. संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी आली आहे. शेगाववरुन अकोल्याला निघालेल्या शिवशाही बसमध्ये ही मोठी दुर्घटना घडली.

या आगीत बस जाळून खाक झाली या बसमध्ये 44 प्रवासी होते, मात्र चालकाच्या सतर्कतेमुळे प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. चालक गाडी चालवत असताना अचानक जळल्याचा वास आला. त्याने बस रस्त्याच्या कडेला उभी केली. तातडीनं सर्व प्रवाशांना बाहेर काढलं. पाहता पाहता बसमध्ये आग लागली आहे. आगीनं रौद्र रुप काही क्षणात धारण केलं आणि संपूर्ण सीट जळून खाक झाल्या.

चालकाने रस्त्यावरून जाणाऱ्या टँकर मधील सिलेंडरच्या साहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला त्यासाठी काही नागरिकांनीही मदत केली. आगीची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. महामार्ग क्रमांक सहावर तुषार हॉटेलजवळची ही घटना आहे

Leave a Reply