
स्थानिक शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी हेल्मेट, लायसन नसल्यास 10500/-चालान देतो. साले तुम्ही सुधरत नाही. तोडपाणी करा नाही तर भरा कोर्ट मध्ये जाऊन पैसे अशी ताकीत देत सुरु आहे दबंग गिरी.
दुसरीकडे बेकादेशीर वाहतुकीस महिना घेऊन खुलेआम दारू वर्धा मध्ये नेण्यासाठी कोणतीही मर्दानगी इमानदारी बघायला मिळत नसल्याने स्थानिक लोकांना ट्रॅफिक पोलीस ठरत आहे डोकेदुखी.
स्वतः नियमबाह्य बिना बॅरिगेट गाड्या अडवून,गाडयांना भर हायवे वर आडवे जात स्वतः जीव धोक्यात टाकतात, पण ही कोणती नशा हा संशोधनाचा विषय आहे. यावेळी तेथे उपस्थित घोराड येथील विक्की विलास मांडवकर प्रहार सेवक (रुग्णसेवक )त्यानां जाब विचारले असता माफ करा असे म्हणून मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत सावरा सावर करीत होते,प्राप्त माहिती नुसार या नंतर असं होणार नाही असा विश्वास दिल्याचे समजते. परंतु प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे स्थानिक शेतकरी रोजमजूर करीत आहे.
