श्री संत केजाजी स्पोर्टीग क्लब घोराड व शिवस्वराज्य ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था सेलू जि. वर्धा तर्फे भव्य कबड्डी सामने झाल्यानंतर बक्षीस वितरण आज पार पडले.

प्रथम पुरस्कार -न्यू लक्ष्मी क्रीडा मंडळ कान्होलीबारा द्वितीय पुरस्कार -जयबजरंग क्रीडा मंडळ सुरगाव तृतीय पुरस्कार -स्वराज क्रीडा मंडळ धानोली गावंडे चतुर्थ पुरस्कार -SSK स्पोर्टींग क्लब घोराड.

याप्रकारे बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवर मा. सौ. ज्योतीताई घंगारे (सरपंच घोराड )यांच्या कडून प्रथम, मा. श्री. रोशनभाऊ राऊत यांच्या कडून द्वितीय, (श्री. दिपकभाऊ धोंगडे[ग्रा. पं. सदस्य] , श्री उमेशभाऊ नक्षीने[ग्रा. पं. सदस्य] , श्री रामूभाऊ वरटकर )यांच्या तर्फे तृतीय व चतुर्थ पुरस्कार देण्यात आले. मा. श्री. रानाभाऊ रननवरे (माजी. जि. पं. सदस्य )यांच्या तर्फे 11000रुपये प्रथम पुरस्कार देण्यात आले.

बक्षीस वितरण कार्यक्रमाला मा. श्री. निलेशभाऊ गुजरकर (पोलीस पाटील घोराड ), मा. श्री. विलासराव चांदनखेडे, श्री संजय तेलरांधे, श्री विनोद देवतारे. उपस्थित मंच्यावर यांच्या हस्ते मेडल वितरण करण्यात आले.

शिवदादा प्रमोदराव तेलरांधे यांच्या तर्फे ट्रॉफी विजेता चार संघाना वितरित करण्यात आले.तसेच मंडळाच्या वतीने उत्तम रेडर, उत्तम ऑल राऊंडर,उत्तम ट्रॅकर, उत्तम डिफेन्डर याप्रकारे शिल्ड मंडळाकडून वितरित केल्या गेले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. विवेक धोंगडे(प्रहार तालुका अध्यक्ष )यांनी केले तर आभार प्रदर्शन मा.श्री रोशनभाऊ राऊत (शिवस्वराज्य ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्थापक, राष्ट्रवादी काँग्रेस वर्धा कार्यकारणी सदस्य, पूर्व जिल्हा सचिव मनसे, पूर्व तालुका प्रमुख राष्ट्रीय बजरंग दल )यांनी केले. तेव्हा बोलत असताना सर्व खेळाडूंना प्रोत्साहन करून दर वर्षी या पेक्षा मोठया प्रमाणात टीम खेळण्यासाठी येणार अशी आशा दिली व सर्व खेळाडूंच्या मेहनतीचे कौतुक केले व शब्दशृंगाणांनी पाठ ठोकावून मनोबल वाढवन्याचे काम केले. तसेच सर्वांनी टूर्नामेंट साठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष केलेल्या मदती साठी आभार मानले.यश ढोबळे ,योगेश ढोबळे, सुरज मोकडे, अक्षय महाकाळकर, आणि यांच्या सर्व सवंगडी मित्र परिवार यांनी या टूर्नामेंट ला पार पाडण्यासाठी रात्र दिवस मेहनत घेतली करिता यांचे विशेष अभिनंदन आभार मानले.

Leave a Reply