बरबडी येथे कलश यात्रा व श्री हनुमान चालिसा सामूहिक पठनाणे नववर्षाचे स्वागत.

गेल्या पाचशे वर्षाचा संघर्ष संपवून श्रीराम आपल्या भव्यदिव्य मंदिरात विराजमान होणार आहेत. या सोहळ्याचे निमंत्रण घेवून पुजित अक्षत कलश स्वागत यात्रा हिंदू उत्सव समिती महसूल नगर बरबडी च्या वतीने आयोजित करण्यात आली होती. ही यात्रा श्री. मारोतराव घोडमारे यांच्या घरून प्रारंभ करून नगर प्रदक्षिणा करून संत गजानन महाराज मंदिर बरबडी येथे समाप्त करण्यात आली. यासाठी श्री. बंडूभाऊ वाळके व पांडुरंगजी गुरनुले यांचे विशेष सहकार्य लाभले.

इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण न करता भक्तीभावाने व्हावी तसेच जगामध्ये सर्वत्र शांतता नांदावी. नवे वर्ष सर्वांना सुखसमाधानाचे ठरावे. सर्वांना सदबुद्धी मिळावी. परस्परांमध्ये प्रेम व सहकार्य असावे, सृष्टीतील सर्व जीव आनंदित असावे. गावातील नागरिकांचे मनोबल व आत्मविश्वास वाढावा व नवीन तारुण्यातील पिढीमध्ये एकता, अनुशासन आणि सामाजिक संघटन निर्माण करण्याच्या हेतूने निखिलेश केळवतकर यांच्या नेतृत्वात नवदुर्गा उत्सव मंडळ आणि नवदुर्गा गणेश मंडळ बरबडी यांच्या सहकार्याने बरबडी गावामध्ये असलेल्या हनुमान मंदिर मध्ये मूर्तीला अंघोळ घालून, गंध, अक्षता, फूल, हार, उदबत्ती, दिवा व नैवेद्य हे उपचार करून ५ वेळा सामूहिक हनुमान चालिसा पठण करण्यात आले.

यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनंतर जयकारा करून नवीन इंग्रजी वर्ष प्रत्येकासाठी अरोग्यदायी राहो अशी प्रार्थना संकटमोचन हनुमंताला करण्यात आली व नंतर प्रसाद वितरण करण्यात आले. यासाठी श्रीराम मंदिर शोभायात्रा समिती चे संजीव लाभे यांचे मार्गदर्शन लाभले. पुर्ण विश्वास व मनाची पवित्रता राखून रोज हनुमान चालिसा पठण केल्यास जीवनात अभूतपूर्व सकारात्मक बदल घडून येतील असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला. व हा कार्यक्रम दरवर्षी साजरा करण्याचा सर्वांनी संकल्प केला.

नवीन पिढीतील तरुणांनी इंग्रजी नवीन वर्ष भक्तिभावाने सुरू करण्याचा हा एक आगळावेगळा उपक्रम गावामध्ये सुरू केल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.यासाठी हनुमान मंदिर चे मुख्य पुजारी श्री. गुरनुले बाबा, अनिकेत अवचट, लोकेष, रूपेश, प्रतिक केळवतकर, शुभम, मयुर मुडे, ऋषिकेश खराटे, तन्मय, ध्रुव रुमाले, तनवी, जय, जित रुमाले, कान्हा, चेतना तपासे, चंदू देशमुख, जगन्नाथ रुमाले, कविता केळवतकर तसेच ग्रामस्थांनी सहकार्य केले.

Leave a Reply