राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा दिवस,महात्मा गांधींच्या सेवाग्रामात संम्पन्न ……

(सेवाग्राम, वर्धा) :- महात्मा गांधींच्या पावन स्पर्शाने पवित्र अशा सेवाग्राम येथे, महात्मा गांधी प्राकृतिक जीवन विद्यापीठ सेवाग्राम वर्धा व आयुष इंटर नॅशनल मेडिकल असोशीएशन (आयमा) यांच्या संयुक्त विद्यामानाने दिनांक १८ नोव्हेंबर २०२३ ला “राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा दिवस” यात्री निवास बापू कुटी परिसर सेवाग्राम येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून श्रीमंत राजे डॉ. मुधोजी भोसले, महाराजा ऑफ नागपूर, विशेष अतिथी डॉ ब्रिजेश मिश्रा प्राचार्य श्री आयुर्वेद महाविद्यालय नागपूर, श्री लक्ष्मिदास सर (अध्यक्ष जीएसपीएस दिल्ली), श्री नारायण भाई भट्टाचार्य (महामंत्री एमजीपीजेवी सेवाग्राम) , डॉ. सतीश कराले ( अध्यक्ष आयमा) उपस्थित होते.

यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते जसे कि त्यात नाविन्यपूर्ण स्वनिर्मित औषधी संकल्पना, रक्तदान शिबीर, विविध विषयावर व्याख्यान तसेच प्राकृतिक चिकित्सेत महत्त्वपूर्ण योगदान (कार्य करणाऱ्यांचा) देणाऱ्यांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. त्यात प्रामुख्याने महात्मा गांधी प्राकृतिक चिकित्सा द्रोणाचार्य अवार्ड, यंग अचिवर्स अवार्ड, चिकित्सा रत्न अवार्ड, एक्सलन्स अवार्ड देऊन सन्मानित करण्यात आले.

महात्मा गांधी प्राकृतिक चिकित्सा द्रोणाचार्य अवार्ड २०२३ चे मानकरी १) डॉ भालचंद्र नेटके २) डॉ धनंजय कुटेमाटे ३) डॉ राजेंद्र विजेता ४) डॉ विनोद ढोबळे ५) डॉ सुधीर मोगरे महात्मा गांधी प्राकृतिक चिकित्सा यंग अचिवर्स अवार्ड २०२३ चे मानकरी १) डॉ प्रशांत तळवेकर २) डॉ धनंजय पाणबुडे याच बरोबर समाज सेवेत उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या माहेर शांतिनिवास या संस्थेच्या अतुल शेळके यांचा सुद्धा सन्मान करण्यात आला.

हा कार्यक्रमा यशस्वी रित्या पार पाडण्यात महात्मा गांधी प्राकृतिक जीवन विद्यापीठ सेवाग्राम वर्धाच्या डॉ प्रशांत तळवेकर, डॉ धनंजय पाणबुडे, डॉ.विवेक धोंगडे, डॉ हर्षा गावंडे, डॉ.शिरीन तळवेकर डॉ. अनिकेत देवढे, ऋषिकेश बडवाईक , डॉ.मयूर दांडेकर, गोरक्ष पुरकाम, डॉ.सिद्धी निखार, नाभी रोका, आकांक्षा रामटेके, प्रियंका सोनवणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Leave a Reply