कृषी केंद्र राहणार चार दिवस बंद……

सध्या पेरणीचा हंगाम सुरू झाला आहे. ऐन पेरणीच्या हंगामातच येणारे चार दिवस कृषी केंद्र बंद राहणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या प्रस्तावित पाच कायद्या विरोधात महाराष्ट्रासह जिल्हा कृषी व्यावसायिक यांनी २ ते ४ नोव्हेंबर पर्यंत बंद पुकारला असला तरी सेलू तालुक्यात हा बंद ५ नोव्हेंबर पर्यंत राहणार आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांपुढे संकट उभे राहिले आहे. गुरुवार ते शनिवार पर्यंत कृषी व्यावसायिकांनी बंद पुकारला आहे. परंतु सेलू तालुक्यातील कृषी केंद्र हे रविवारीही बंद राहत असल्याने चार दिवस शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागणार आहे. राज्य सरकारच्या प्रस्तावित विधेयक व ४४ मधील जाचक नियमांना विरोध करण्यासाठी व प्रस्तावित पाचही कायदे रद्द करण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला आहे.

परंतु सध्या रब्बीचा पेरणी हंगाम असल्यामुळे शेतकरी पेरणीच्या मागे लागणार आहे. त्यासाठी आवश्यक त्या औषधी, खते, बी-बीयाणे विकत घेण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी केंद्रात जात असतात. परंतु चार दिवस कृषी केंद्र बंद राहणार असल्याने शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे शासनाने व्यावसायिकांच्या आंदोलनाची दखल घेत यावर तोडगा काढण्याची आवश्यकता असल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे

Leave a Reply