अक्षय माहुरे टरबूज पिकात सर्वाधिक उत्पादन घेणारा शेतकरी – सेलू तालुक्यात 2.5एकरात 100टन

सेलू तालुक्यात टरबूज पिकात अव्वल सर्वाधिक उत्पादन घेणारा युवा शेतकरी अक्षय माहुरे घोराड येथील असून भुजंग आणि ब्लॅक सुप्रिमो इंडस सीड्स चे टरबूज लागवड 2डिसेंबर रोजी केली होती. अक्षय माहुरे यांच्या सांगण्या नुसार कमीत कमी खर्च करून कमी फवारण्या स्वस्तात स्वस्त औषधी वापर करून समोर भावं काय मिळेल? हिवळ्यात उत्पादन कमी मिळत असते अश्या सर्व बाबींमुळे खर्च कमी करायचे ठरविले व रोज नित्यनेमाने इंडस सिड्स चे अमोल महाजन व धरती धन कृषी केंद्र वर्धा तसेच विवेक धोंगडे सौरभ वैद्य( बी एस सि ऍग्री) यांच्या मार्गदर्शना नुसार कमीत कमी खर्चात पीक तयार केले व पूर्णतः 2.5एकरात 100 टन इतके उत्पादन प्राप्त केले. विशेष म्हणजे ताक अंडी याचा वापर करून चांगला फायदा झाल्याचे अक्षय माहुरे यांनी सांगितले. तसेच ट्रायकोडर्मा, NPK जीवानू पंजाबराव कृषी विद्यापीठ नागपूर असा नैसर्गिक जीवानूचा जास्तीत जास्त वापर केल्याचे सांगितले. सुरवातीला 30-28रुपये किलो या भावानी नागपूर येथे पंकज गुल्हाने या दलाला कडे माल विकला.त्यानंतर होळी नंतर टरबूजाचे भावं कमी होत गेले व शेवटचा भावं 12रुपये इतका मिळाला.त्याच मल्चिंग ड्रीप वर सध्या बाकी वेगवेगळे पीक लागवड केल्याची माहिती अक्षय माहुरे यांनी दिली आहे. माहिती करिता संपर्क क्रमांक खाली दिलेले आहे. अक्षय माहुरे शेतकरी 9604877958 अमोल महाजन सीड्स 99228 76145 विवेक धोंगडे शेतकरी -9370781596 सौरभ वैद्य ऍग्री मार्गदर्शन -9359034104 धरती धन कृषी केंद्र वर्धा -9822462567 पंकज गुल्हाने कळमना मार्केट -8888822012 रुपेश घोडे कळमना मार्केट -9970550741