घोराड येथे बांधकाम कामगारांचे पेटी वाटपात लाभार्थ्यांची तुफान गर्दी

गोंधळाचे स्थीतीमुळे पोलीसांना करावे लागले पाचारणवाटप करताना नियोजनाचा अभाव ,रस्त्यावर वाहनांच्या रांगा.

घोराड येथील भक्त निवासमध्ये रविवारी कामगार कल्याण योजनेअंतर्गत कामगारांना पेटी वाटप सुरू करण्यात आले, यावेळी पेटी घेण्यासाठी लाभार्थ्यांनी तुफान गर्दी केली होती, येथे लाभार्थ्यांना पेटी वाटप करताना निर्माण झालेली गोंधळाची परिस्थिती पाहता शेवटी पोलीस यंत्रणेला पाचारण करावे लागले यासाठी बाहेर गावातून लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित झाल्याने रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या रस्ताच वाहनामुळे बंद झाल्याचे चित्र निर्माण झाले होते येथे पेटी वाटप करत असताना नियोजनाचा अभाव आणि दलालांची चालती पाहता पात्र लाभार्थ्यांना भर उन्हात तास न तास बाहेर रांगेत ताटकळत उभे राहावे लागले या योजनेअंतर्गत गावा नुसार वाटप सुरू असताना इतर ठिकाणाहून आलेल्यांना टोकण तथा पेटीचे वाटप केले जात आहे सुरवातीला येथून बाहेरगाव वरून टोकण घेऊन आलेल्याना पेटीचे वाटप केले गेले अनेकांनी येळाकेळी येथून टोकण आणले ग्रामपंचायत निहाय टोकण देऊन तिथेच लाभार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात यावे अशी मागणी केली जात आहे . साहित्य वाटप करताना होणारी गर्दी आणि लोकांची होणारी गैरसोय पाहता ही अशी गावनिहाय व्यवस्था असावी अशी मागणी केली जात असताना घोराड येथे बाहेरून आलेल्याना पेटीचे वाटप केले गेले घोराड येथील काहिंनी तर बाहेर ठिकाणी जाऊन टोकण तर कुणी पेटीही आणल्या याला या विभागाचे लोक जबाबदार आहे यातच दलाली प्रवृत्ती यात असल्याने यात नेहमीच गोंधळाची स्थिती निर्माण होते बाहेर गावातील लोकांना होत असलेले वाटप पाहता ग्रामस्थांनी एकच गोंधळ घातला शेवटी बाहेर गावातून आलेल्याना पेटीचे वाटप येथे नाही केवळ घोराडसाठी हा वाटप असल्याचे त्यांना जाहीर करावे लागले तेव्हा काही प्रमाणात गर्दी कमी झाली येथे साहित्य तथा टोकण वाटप करताना कसलेही नियोजन संबधीत यत्रेणेकडून केले जात नाही त्यातच कुठे कुठे राजकीय वशिलेबाजी सुरु असल्याने सामान्य माणसाला आल्या पावली परत जावे लागते याची दखल शासनाने घ्यावी व यात होणारी लाभार्थ्यांची गैरसोय पाहता गावनिहाय पात्र लाभार्थ्यांना टोकण देऊन साहित्याचे वाटप करावे अशी मागणी केली जात आहे.

या पेटी वाटप करण्यात माजी सरपंच सौ.ज्योती ताई घंगारे , रामेश्वर घंगारे, चिंतामण महाकाळकर, आशिष डोळस्कर, व कार्यकर्ते यांनी स्वतः दिवसभर उभेराहून पाण्याचे कॅन बोलून लाभार्थ्यांना सोयी सुविधा पुरवल्या आणि शांत पद्धतीनी वाटप माजी ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच यांच्या नियोजनात पेटी वाटप कऱण्यात आला तर काई नियमबाह्य पद्धतीने आपल्या पत्नीचा नंबर कसा लावता येईल याची उचापती करीत असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

Leave a Reply