कर्मचारी येतात मनमर्जीने बेटाईम,सेलू बँक ऑफ इंडिया मध्ये क्रॉप लोन साठी शेतकरी मारतोय उन्हात चकरा.

सेलू बँक ऑफ इंडिया मध्ये कर्मचारी येतात मनमर्जीने. क्रॉप लोन चा थप्पा इतक्या गर्मीत थंड बस्त्यात. शेतकरी मारतोय उन्हात चकरा. कर्मचारी कमी असल्याने काम होत नसल्याचे सांगितले जाते.

पेरणी तोंडावर असतांना सर्व शेतकरी बियाणे वेळेवर मिळत नाही म्हणून मे महिन्यातच घरी बि बियाणे रासायनिक खत घरी आपल्या सोयीनुसार आणून ठेवतात परंतु बँक क्रॉप लोन न मिळाल्याने अडचणीत आल्या मुळे सध्या बँक ऑफ इंडिया सेलू शेतकऱ्यांना मनस्ताप ठरत आहे.

कर्मचारी आपल्या मनमानी कारभार करीत असून येण्याचा त्त्यांचा टाइम नाही. लंच टाइम ला अर्धा पाऊण तास जेवण झाल की त्यानां येते सुस्ती ac मध्ये बसून त्यानां शेकऱ्यांच्या वेदना कश्या कळणार बिचारा 10 चकरा मारून माहिती होते कि कर्ज मिळू शकणार नाही. अशी अवस्था निर्माण झाली असून लोकप्रतिनिधी सुद्धा यावर लक्ष घालायला तयार नाही.

बँक मध्ये 2ते 2:30असते लंच टाइम. लोकांची गर्दी इतकी कि रांगेत कित्येक वेळ उभे राहावं लागते. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कुठे दिसून येणार नाही. कर्मचारी काम सोडून खर्रा खायला, खर्रा थुकायला मारतात 10 चकरा आत बाहेर. काही कर्मचारी धूम्रपान करण्यासाठी दुपारी 2ते 3 च्या दरम्यान पानंठेल्यावर. यामुळे बँक चे काम मंदावले तर नाही ना अशी ओरड सर्व खातेदाराकडून होत आहे.