प्रहारची रुग्णसेवा ठरत आहे सर्वसामान्यांसाठी आधार.

सर्वांना माहीत की देशात लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते आपल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचारासाठी फिरत आहे पण वर्धा जिह्यातील परिचित असलेला प्रहार जनशक्ती पक्ष आपली रुग्णसेवा करण्यासाठी प्रामाणिकपणे काम करत आहे, कारण सर्वसामान्याचा विश्वास हा प्रहार आहे जिथे कमी तिथे आम्ही अशी भावना प्रहारची असल्यामुळे प्रहार हि लोकांच्या गळ्यातील ताईत झाले प्रत्येक अडचणीत जर कोणी कामी येत असेल ती प्रहार आहे, ह्याच भक्कम विचारधारेवर प्रहार कायम आहे हिंगणघाट,समुद्रपुर, धामणगाव रेल्वे तालुक्यातील रुग्ण कस्तुरबा रुग्णालय सेवाग्राम येथे उपचारासाठी भरती आहे. पेशंट सौ. सुवर्णा निखिल नंदेकर रा.-खेकडी ता -हिगणघाट जि- वर्धा यांना १ युनिट व सौ.सेविका वैरागडे रा. कोऱ्हा ता. समुद्रपूर यांना १ युनिट व सौ मीराबाई नारायण राऊत रा.दाभाडा तहसील धामणगांव रेल्वे जि.अमरावती. यांना २ युनिट आवश्यकता होती,हि बाब जेव्हा प्रहारचे वर्धा जिल्हाप्रमुख जयंत तिजारे यांना कळताच त्यांनी आपले सहकारी सेलू तालुका प्रमुख विवेक धोंगडे उपतालुका प्रमुख नितेश भोमले,पुष्पक ढोले, विक्की मांडवकर, भूषण चंदनखेडे यांना सोबत घेऊन सेवाग्राम रुग्णालय गाठले व पुष्पक ढोले, विक्की मांडवकर, भूषण चंदनखेडे,नितेश भोमले यांनी रक्तदान करुन त्या रूग्णाला चार युनिट रक्ताची मदत केली व रुग्णांची भेट घेत तब्येतीची विचारपुस केली व आपल्याला काहीही मदत लागल्यास कधीही आम्हाला सांगा आम्ही आपल्याला मदती साठी तत्पर राहु अशी ग्वाही कुटुंबाला दिली,म्हणुनच प्रहार हा जनसामान्यांना सुखा दुःखात साथ देणारा पक्ष म्हणुन काम करतो त्यामुळे प्रहार मधिल काम करणारा प्रत्येक कार्यकर्ता मनात सेवा ठेऊन उन्हात पावसात थंडीत कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता आपली सेवा देतो व ग्रामीण शहरी भागात प्रामाणिकपणे आपले रुग्णसेवेचे काम करतो अशी भावना जनमानसात आहेयावेळी समुद्रपूर तालुका अध्यक्ष प्रमोद म्हैसकर,स्नेहल किन्नाके…. सोबत होते. #सेवा_हाच_आमचा_धर्म # #सेवा_हिच_आमची_जात # #सेवा_हेच_आमचे_कर्म #

Leave a Reply